दारु समर्थक उमेदवारांना गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेसाठी तिकीट देऊ नका’

-‘जिल्हा दारूबंदी कायम राखली जाईल हे आश्वासन द्या, नंतर मते मागा’ -राजकीय पक्षांना गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यात गेली ३१ वर्षे शासकीय दारूबंदी आहे व तिला जनतेचे व्यापक समर्थन आहे. जिल्ह्याभरात दारुमुक्ती चळवळ सक्रीय असून ७०० गावांनी  गावातली दारु पूर्णपणे बंद केली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देतांना राजकीय पक्ष तसेच युती व आघाडी यांनी हे भान ठेवावे की दारूबंदी विरोधक किंवा दारु समर्थक उमेदवाराला येथील जनता मत देणार नाही. पक्षांनीच त्यांना तिकीट नाकारावे.
२०१९ व २०२४ च्या निवडणुकांपूर्वी येथील सर्व पक्षांच्या उमेदवारांनी ‘मी दारूबंदीला समर्थन करीन’ असे लिखित वचन दिलेले आहे. त्यांच्या वचनांचे व्हिडियो देखील यू-ट्यूबवर टाकलेले आहेत. पण तरी देखील काही राजकीय नेत्यांनी या पाच वर्षात दारूबंदी उठवण्याची मागणी किंवा कृती केली आहे. या वचनभंगाची नोंद येथील मतदारांच्या स्मृतीत आहे.
काही नेत्यांनी जिल्ह्यातील दारूबंदीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यावर १४०० गावातून एक लक्ष सह्यांचे प्रस्ताव राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले होते. ११०० गावात मुक्तीपथ गाव संघटना जागृत व सक्रीय आहे. येथील स्त्रियांनी प्राणपणाने आपआपले गाव दारुमुक्त ठेवले आहे व त्या जिल्हा दारुमुक्त ठेवण्यास कटीबद्ध आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हा येथील स्त्री-पुरुषांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटना, सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की –
१. दारु समर्थक उमेदवारांना या जिल्ह्यात तिकीट देऊ नका.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम राखली जाईल हे जाहीर आश्वासन पक्षातर्फे निवडणुकीपूर्वी द्या.
Comments (0)
Add Comment