डॉ. किशोर मानकर यांची गडचिरोली वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकपदी नियुक्ती

२००६ च्या भारतीय वन सेवेतील आहेत  अधिकारी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि ०३ मार्च :- जिल्ह्यातील पाच वन विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या गडचिरोली येथील वनवृत्ताच्या वनसंरक्षकपदी शासनाने नागपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांची नियुक्ती केली आहे.

महसूल व वनविभागाने 2 मार्च रोजी राज्यातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या पद बाबत आदेश काढले आहेत.

यामध्ये गडचिरोली वनवृत्ताच्या मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक पद आस्थगित ठेऊन वनसंरक्षक (प्रादेशिक ) पद तात्पुरत्या स्वरुपात वनसंरक्षक सवर्गात जोडून रिक्त होणाऱ्या पदावर डॉ. किशोर मानकर यांची नियुक्ती केली आहे. डॉ. किशोर मानकर हे २००६ च्या भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत.

गडचिरोली येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक पद रिक्त असल्याने प्रशासनाने डॉ.किशोर मानकर यांची नियुक्ती केली आहे वन विभागातील प्रलंबित कामे तसेच वनविभागाच्या विकास कामात जंगल व्याप्त असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या .पालक मंत्र्याच्या आढावा बैठकित मुद्दा उचलला गेला होता. अश्या विविध कामाना चालना मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत.