लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली दि, १६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टायगर ग्रुप मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आलापली येथील टायगर ग्रुप यांच्या जनसंपर्क कार्यालायातून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . सकाळी भव्य आरोग्य शिबिर आयोजित करून लाभार्त्याना आयुष्मान भारत कार्ड बनवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी ग्रामस्थानी या योजनेचा लाभ घेत आरोग्याची तपासणी शिबिरात करून घेतली .
त्यानंतर टायगर ग्रुप नारीशक्ती (महीला गट) मार्फत बजरंग चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेल्या पुस्तकाचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून उज्वल भविष्य बनविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले तर सायंकाळी ६:०० वाजता च्या दरम्यान विरबाबुराव सेडमाके चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केक कापून उपस्थित भीम अनुयायी तसेच गावातील नागरिकांना बटर-मिल्क वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमास्थली असलेल्या डिजिटल डिस्प्ले द्वारा प्रसारित होणाऱ्या डॉ.बासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेल्या चालचित्राने लक्ष वेधले असल्याने टायगर ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक होत आहे .
हे देखील वाचा,
https://fb.watch/jXpFNd_9A_/