डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे साजरी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 06 जुलै – गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपचे अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी एक देश में दो विधान,दो निशान, दो प्रधान नही चलेंगे, नही चलेंगे.. असा नारा देऊन जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, थोर तत्वज्ञ, प्रखर देशभक्त, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करून अमर रहे अमर रहे, भारत माता की जय ! वंदे मातरम्, अशा जयघोषाने खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी खासदार अशोकजी नेते, भाजपचे जेष्ठ नेते रमेशजी शभुरसे,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,जिल्हा उपाध्यक्ष अरूण हरडे,उपाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,दतु माकोडे,भुपेश कुळमेथे,युवा मोर्चाचे बंटी खडसे,आशिष कोडाप, हर्षल गेडाम, प्रशांत अलमपटलावार, पाथरीचे तुकाराम पा. ठिकरे, अशोक ठिकरे,स्विच सहाय्यक रविंद्र भांडेकर,सुरेश मांडवगडे, राकेश राचमलवार, महिला आघाडीच्या माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे, फुलचंद वाघाडे कार्यालय प्रमुख,दिवाकर गेडाम खासदार महोदयांचे सोशल मिडीया प्रमुख,सुरज कमलापुरकर,दिनेश नंदनवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-