डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज अमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.१० फेब्रुवारी : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” शासन निर्णय दि. ११/१०/२०१३ अन्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे.

सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दि. १८ फ्रेबुवारी, २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा.

प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवुन अंतिमरित्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणा-या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. दि. दि. १८ फ्रेबुवारी, २०२२ नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

हे देखील वाचा : 

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान

चंद्रपूरचा ‘सारंग बोबडे’ फोर्ब्सच्या यादीत

 

 

dr jakir hussain madrsa schemegadchiroli districtlead news