लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील एका युवतीचे आई-वडिलांमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाल्याने रागाच्या भरात मुलीने कीटकनाशक प्राशन केले.
करुणा पोचमलू निर्ला (२०) रा. कमलापूर, असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव असून कमलापूर येथील निर्ला कुटुंबातील करुणा हिचे आई-वडिलांशी भांडण झाले. भांडण अधिकच विकोपाला गेल्याने त्यावेळी आईने मीच विष प्राशन करून मरते, अशी धमकी मुलीला दिली. आईने बोलल्याचे शब्द मुलीच्या मनाला बोचल्याने तिने रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन केले उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला. ही घटना अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे रविवार, ८ डिसेंबर रोजी सायकालच्या सुमारास घडली.
शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी असलेले कीटकनाशक घरी शिल्लक होते.सदरचे विष मुलीने प्याल्याची बाब काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले; परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते.तसेच रुग्णवाहिकासुद्धा वेळेत मिळाली नसल्याने युवतीला दवाखान्यात नेण्यास उशीर झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा,