अशोक चव्हाण यांच्या मुळे मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा आ.विनायक मेटे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना दि २७ डिसेंबर :- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या प्रक्रियेत अशोकराव चव्हाण यांच्यामुळेच हा सगळा खेळखंडोबा झाला आहे ही वस्तुस्थिती आहे, केवळ राजकारण करून एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यात ते धन्यता मानतात सरकारने मराठा समाजातील सगळ्या संघटनांना विश्वासात घेण्याची गरज आहे परंतू सरकार तसे काहीच करत नाही त्यामुळेच सगळीकडे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आ.विनायक मेटे शनिवारी जालन्यात म्हणाले .
मराठा समाजातील सगळ्या संघटनांनी एकत्र आले पाहिजे आणि या सगळ्या प्रश्नावर विचार केला पाहिजे .मी मोठा की तू मोठा ,मी शहाना की तू शहाना यावर वाद घालू नये कायदेतज्ज्ञाचे मत घ्यावे . इडब्युएस च्या आरक्षणासंदर्भात संभाजी महाराजांसह अनेकांच्या मनात काही शंका आहेत. सरकार ने त्या दूर केल्या पाहिजेत पण ते सरकार करत नाही त्यामुळेच संभ्रम निर्माण होत आहेत असे मेटे म्हणाले. सध्या सरकार ने जो आरक्षण देण्याचा जीआर काढला आहे . त्यात स्पष्ट म्हटले पाहिजेत की सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण मान्य झाल्यास हे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षण आपोआप रद्द होईल असे मेटे यांनी सुचवले आहे.
ओबीसी समाजातील काही नेत्याना मोठे व्हायचे आहे त्यामुळे ते मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत आहेत यात सरकारचे मंत्री वडेट्टीवार आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मेटे यांनी मागणी केली आहे.