लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 18 नोव्हेंबर :- स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रज सरकारच्या अन्याया विरोधात चीड निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरी मधून अग्रलेख लिहिला होता की ,’ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ‘ या अग्रलेखामुळे इंग्रज सरकारने टिळकांवर खटला भरला होता. याच शिर्षकाचे होर्डिंग मुंबईतील माहीम आदी परिसरात लावले गेले आहेत. हे होर्डिंग्ज कुणी लावले? का लावले? यातून होर्डिंग्ज लावणाऱ्याला काय सुचवायचे आहे ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत
आज मुंबईत अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. रस्त्यांवर खड्डे का खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळत नाही. फूटपाथ फेरीवाल्यांनी अडवल्या आहेत,अनधिकृत बांधकामांनी कहर केला आहे.पाणी, आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आणि महाराष्ट्रातील राजकिय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात मश्गूल आहेत. सर्वसामान्य लोकांचे जगणे हलाखीचे झाले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर हे बोर्ड लागल्यामुळे एकच चर्चेचा विषय ठरले आहेत.
हे पण वाचा :-