सदर बाजार पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार अल्पवयीन मुलीचे थांबले लग्न

विजय साळी – जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ११ डिसेंबर: सदर बाजार पोलिसांच्या सतर्कतेमुळे जालना शहरातील 4 अल्पवयीन मुलींचे विवाह थांबविण्यात पोलीस प्रशासनाला यश आलंय, त्याची माहिती अशी की, जालना शहरातील लोधी मोहल्ला येथे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये एकूण सतरा मुलं व 17 मुलींचे विवाह होणार होते परंतु त्यामध्ये एका मुलीचे वय 14 वर्ष असल्याबाबतची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री संजय देशमुख यांना मिळाल्याने त्यांनी खात्री करण्यासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांना सांगितले. त्यानंतर खात्री करण्यासाठी पवार यांनी सदर ठिकाणी जाऊन सामूहिक विवाह सोहळा आयोजकांना भेटून त्यांना काद्राबाद चौकी येथे बोलावून त्यांच्या मुला मुलींचे वयाचे प्रमाणपत्र हस्तगत करुन खात्री करीत असताना त्यांना कळाले की त्यापैकी आणखी तीन असे एकूण चार मुलींचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यांनी कमी वय असलेल्या पालकांना वेगळे बोलावून त्यांना कायद्याची जाण देऊन मुलींचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करावे असे समज पत्र पोलिस निरीक्षक श्री संजय देशमुख यांच्या समक्ष हजर करून त्यांना दिलं, व त्यांचे समुपदेशन केले, त्यानंतर आमच्या मुलींचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच आम्ही करणार असल्याची खात्री वधुकडील मंडळींनी दिली, त्यानंतर 17 जोडप्यांचे ऐवजी वय पूर्ण झालेल्या 13 जोडप्यांचे लग्न झाले व चार जोडप्यांचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करण्याचे समज पत्र दिल्याने चार कोवळ्या वयातील मुलींचे लग्न रोखण्यास सदरबाजार पोलिसांना यश आले.

सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रांत देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मंजुषा सानप पोलीस उप निरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पल्लवी जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार पोलीस नाईक सक्रूदिन तडवी पोलीस कॉन्स्टेबल, इर्शाद पटेल, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका यांनी केली