लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ एप्रिल: महाराष्ट्रात कोरानाच्या संसर्गाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्याला रोखण्यासाठी राज्यात “ब्रेक द चैन” अंतर्गत निर्बंध घालण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी काढलेल्या आदेशानुसारच आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचा असेल तर त्यासाठी पोलीस दलाकडुन ई-पास घेणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावीत केलेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली यांचेकडुन सुचित करण्यात येते की, अत्यावश्यक सेवा म्हणजे, वैद्यकीय कारण, आजारी नातेवाईकांना भेटणे, अंत्यविधी इत्यादीसाठी आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार नागरीकांना पुढील दोन प्रकारे प्रवासासाठी पास मिळेल.
१) स्थानिक पोलीस स्टेशनला अत्यावश्यक कागदपत्रांसह. २) ईपास. ई-पास काढण्यासाठी सरकारी वैद्यकिय अधिकाऱ्याकडुन कोविड-१९ चे कोणतेही लक्षण नसलेले वैद्यकिय प्रमाणपत्र ध्यावे लागेल. ई-पाससाठी अर्ज करन्या करिता सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जावुन त्याठिकाणी विचारलेले अत्यावश्यक कारण, कागदपत्रे नमुद करावे, त्यानंतर फोटो अपलोड करुन अर्ज दाखल करा. अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन ID मिळेल तो ID सेव्ह करुन त्या ID वरुन तुमच्या ई-पास ची मंजुरी पोलीस विभागाकडुन पडताळणी होवुन तुम्हाला ई-पास डाऊनलोड करता येईल. अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडुन दिलेला पास सोबत असने बंधनकारक राहील, तसेच आंतरजिल्हा, आंतरराज्य तसेच जिल्हाअंतर्गत प्रवास करतेवेळी चालकासह वाहनक्षमतेच्या फक्त ५० टक्के प्रवासी प्रवास करु शकतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी.