खा. अशोक नेते यांचा ब्रम्हपूरी तालुक्यात संपर्क दौरा

पंचायत समिती स्तर कामांचे खा. अशोक नेते आणि माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते भूमीपुजन. जनतेचे प्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ब्रम्हपूरी : पंचायत समिती अंतर्गत 15 वा वित्त आयोग, पंचायत समिती स्तर अंतर्गत पंचायत समिती सदस्यांनी सुचविलेल्या कामांचे भूमीपुजन दिनांक 3 जूनला चिमूर- गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खा. अशोक नेते आणि माजी आमदार अतुल देशकर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती रामलाल महादेव दोनाडकर, उपसभापती सुनिताताई ठवकर, पं. स. सदस्य नीलकंठजी मानापुरे उपस्थित होते.

आवळगांव पंचायत समिती गणामध्ये या गणाचे नेतृत्व करणारे सभापती रामलाल महादेव दोनाडकर यांनी सुचविलेल्या कामांमध्ये बरडकिन्ही येथे सुरज दोनाडकर यांचे घरापासून अभिमनजी बावणगडे यांचे घरापर्यंत बंदिस्त नाली बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी बरडकिन्ही येथील ज्येष्ठ भाजपा नेते देवराव नखाते. माजी सरपंच विजय हूड, भाजपा युवा नेते विनोद ठाकरे, हरिश्चंद्रजी दोनाडकर, माजी अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था मर्यादित बरडकिन्ही यांचेसह गावातील बहुसंख्य जनता उपस्थित होती.
वांद्रा येथे महादेव मडावी यांचे घरापासून भोजराज कुंभारे यांचे घरापर्यंत सीसी रोड बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच महादेवजी मडावी, उपसरपंच गुरुदेव वाघरे, सदस्य प्रमोद सातपुते, लोमेश गेडाम, कविता पाल, संगिता ठाकरे, अंजली राऊत, ताराबाई कामडी, मेश्राम सर, पांडुरंगजी पाल, रामकृष्णजी मेश्राम, महादेवजी मेश्राम, ईश्वरजी घुबडे इ. सह बहुसंख्य जनता उपस्थित होती.

गांगलवाडी पंचायत समिती गणामध्ये मौजा गांगलवाडी येथील अंगणवाडी क्र 3 ला 40 मीटर संरक्षण भिंत बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. हे काम उपसभापती सुनिताताई ठवकर यांनी सुचविलेले काम आहे. यावेळी सरपंच धनंजय बावणे, ग्रा. पं. सदस्य विवेक बनकर ,सदस्या मालन म्हशाखेत्री, चंदा म्हशाखेत्री, हिरकन्या कोसे, भाजपा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष राजेश्वरजी मगरे, ग्राम विस्तार अधिकारी मेश्राम इ. सह गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

मुडझा पंचायत समिती गणामध्ये मुडझा येथे पं स. सदस्य नीलकंठजी मानापुरे आणि  रेवता नीलकंठजी मानापुरे यांचे कडून मुडझा प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचे देखील भूमिपूजन खासदार साहेबांचे आणि अतुलभाऊंच्या हस्ते करण्यात आले.

या ठिकाणी पुष्प गुच्छ देऊन सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला
15 वित्त आयोग पंचायत समिती स्तर कामामध्ये मडझा येथे हरिदास कावळे ते वासुदेवजी निशाणे यांचे शेतापर्यंत नाली बांधकाम आणि शोषखड्डा बांधकाम आणि 15 वित्त आयोग ग्रा. पं स्तर अंतर्गत मागासवर्गीय वस्तीत नाली बांधकामाचे देखील भूमीपुजन करण्यात आले.

यावेळी सरपंच होनाजी नैताम, उपसरपंच लोमेशजी राऊत, व सर्व ग्रा.पं.सदस्य तथा सदस्या तसेच ग्रामसेवक मेश्रामजी उपस्थित होते. तसेच माजी सरपंच घनश्यामजी तोमटी,  झरकर सर, विठ्ठलजी मुनघाटे, भुजंगराव राऊत, हरिभाऊ चुधरी, मनिष मानापूरे, गिरीश मानापूरे, श्यामरावजी चौधरी, यशवंतजी राऊत यांचेसह बहुसंख्य लोक उपस्थित होते.

प्रत्येक ठिकाणी अशोक नेते आणि अतुल देशकर यांनी जनतेशी संवाद साधला आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे अभिवचन दिले याच बरोबर जनतेनी कोरोना महामारीपासून सुरक्षीत राहण्यासाठी मास्कचा वापर करा, सानीटायझर्स चा वापर करा, आणि सोशल डिस्ट्न्सशींग पाळा असे आवाहन प्रत्येक वेळी करण्यात आले.

या यशस्वी झालेल्या कार्यक्रमांचे नियोजन अनिलजी तिजारे सरपंच तळोधी, द्यानेश्वरजी पाटील दिवटे बल्लारपूर, युवा भाजपा नेता, आविनाश मस्के, भाजपा सोशल मिडिया संयोजक ब्रम्हपूरी तालुका, धीरज पाल भाजपा सोशल मीडिया सहसंयोजक ब्रम्हपूरी तालुका शब्दाला मान देऊन संपूर्ण कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविल्याबद्द्ल खा. अशोक नेते आणि प्रा. अतुल देशकर माजी आमदार ब्रम्हपूरी यांचे आभार रामलाल महादेव दोनाडकर सभापती पंचायत समिती ब्रम्हपूरी तथा तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रम्हपूरी तालुका ग्रामीण यांनी मानले.

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 43 कोरोनामुक्त, तर 48 नवीन कोरोना बाधित

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीच्या वतीने वृक्षारोपण

कोविड बाधीतांच्या नातेवाईकासाठी भाजपची नमो भोजन व्यवस्था २० दिवसापासून अविरत सुरू

 

ashok netelead story