खजूर खा आणि हेल्दी राहा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण नोकरीसाठी घराबाहेर जात असतात. अशातच गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या महासंकटाने सगळ्यांना चिंतेत टाकले आहे. या धावत्या जगासोबत आपल्यालाही धावायचे असेल तर आरोग्याची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात थोडे फार बदल करणे महत्वाचे आहे. अनेकांना माहिती असेल आम्ही पण तुम्हाला सांगितले होते कि, काळा मनुका आणि बदाम हे भिजवून खाल्ले तर आरोग्यास खुप फायदे होतात. खजूर हे देखील भिजवून खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात.

आयुर्वेदिक तज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामवर भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे सांगितले आहेत. रात्री भिजवून ठेवलेले काळा मुनका, बदाम आणि खजूर सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी खाल्ल्यास तुम्हाला अनेक फायदे होउ शकतात. अनेकांना वाटते की खजूर हे आपल्या शरीरासाठी गरम असते. पण हा समाज चुकीचा आहे. खजूर हे आपल्या शरीरासाठी अतिशय थंड आणि सुखदायक असते.

खजूर खाल्ल्याने बध्दकोष्ठतेची समस्या टळते, हृदयाचे आरोग्य सुधारते, निरोगी कोलेस्टेराॅल नियंत्रिण ठेवण्यास मदत होते, हाडांचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रित करते, स्त्री आणि पुरूष दोघांची लैंगिक शक्ती वाढवते, मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, थकवा दूर करते, अशक्तपणा दूर करण्यासाठी फायदेशीर, वजन वाढण्यास फायदा, मुळव्याध प्रतिबंधित करते, जळजळ प्रतिबंधित करते, निरोगी गर्भधारणेसाठी फायदेशीर, त्वचेसाठी आणि केसांसाठी सर्वोत्तम आहे. आरोग्यासाठी खजूर सकाळी रिकाम्यापोटी, दुपारचे जेवण म्हणून, मिठाई खावीशी वाटेल तेव्हा आणि झोपतांना तुपासह खाण्याचे योग्य परिणाम दिसतात.

हे पण वाचा :- 

 

and stayEat dateshealthy