माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची धाड…

"कुणी काहीही मागणी केली तरी चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल" असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

पुणे डेस्क : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे. त्यानंतर विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वांचं लक्ष कोरोनाकडे असायला हवं, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत, असं वळसे पाटील म्हणाले.

“मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवं. कुणी काहीही मागणी केली तरी चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

अनिल देशमुखांच्या घरावर छापेमारी

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.

हे देखील वाचा  :

राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या; हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी – कृषीमंत्री दादाजी भुसे

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन जिल्ह्यांना करून द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य विभागास सूचना

सोशल मीडियावरून मदतीचे केले आवाहन आणि उभा राहिला ‘त्या’ निराधार आजीसाठी निवारा…

 

 

Anil DeshmukhDilip Walse Patillead story