एकल अभियान अंचल आलापल्ली अभ्युदय युथ क्लब खेल कूद समारोह संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

आलापल्ली, 13 ऑक्टोंबर : एकल अभियान अंचल आलापल्ली संच सुंदरनगर येथे अभ्युदय युथ क्लब अंचल स्तरीय खेल कूद समारोह संपन्न झाला. एकल अभियान अंचल आलापल्ली अंचल स्तरीय खेल कूद समारोह सुंदरनगर येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला 10 संचातील संच प्रमुखांनी आप आपल्या संचातून आचार्य व मुलांना घेऊन आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता ,भारत माता चे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रत्यक्ष मैदानात जाऊन कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी यांनी विधीवत पूजा करून उद्घाटक करण्यात आले.

या खेल कुद समारोहात कबड्डी, उंच उडी, लांब उडी, रनींग 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक संचातील मुलं उत्सुकतेने जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका ताई कंचकटले विदर्भ भाग आरोग्य योजना प्रमुख तसेच अंचल आलापल्ली प्रभारी यांनी केले. प्रास्ताविकेतून एकल संकल्पना, पंचमुखी शिक्षा, ग्रामीण क्षेत्रात एकल अभियान कशाप्रकारे कार्य करते , तसेच खेल कूद समारोह विषयी , आजच्या काळात शिक्षणासोबतच खेळाचे महत्त्व किती आहे, मुलांमध्ये खेळाची रूची निर्माण करावे, संभाग स्तर, राष्ट्रीय स्तरावरची खेल कूद समारोह विषयी,इत्यादी विषयांवर आपल्या प्रास्ताविकेतून महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंचल टोळी,संच टोळी व आचार्य यांनी भरपूर मेहनत घेतली व सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बुरमवार ग्राम स्वराज मंच प्रमुख, एकल अभियान अंचल आलापल्ली यांनी केले. कार्यक्रमाला सुंदरनगर परिसरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक बादल शहा सामाजिक कार्यकर्ता सुंदरनगर , कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम भैया सोनानिया, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजु सरकार ग्राम पंचायत उपसरपंच सुंदरनगर, प्रमुख अतिथी विजय जी बिश्वास ग्राम पंचायत सदस्य सुंदरनगर, प्रमुख अतिथी अनादी हलदार, प्रमुख अतिथी परेश जी बिश्वास बजरंग दल सहसंयोजक मुलचेरा, रेणुका ताई कंचकटले विदर्भ भाग आरोग्य योजना प्रमुख तसेच आलापल्ली अंचल प्रभारी ,नरेश गड्डमवार अंचल अभियान प्रमुख,संजु चौधरी अंचल प्राथमिक शिक्षा प्रमुख, महेश बुरमवार अंचल ग्राम स्वराज मंच प्रमुख,दिलीप शेडमाके अंचल कार्यालय प्रमुख, राहूल निलम अंचल व्यास ,संच टोळी, आचार्य व मुले उपस्थित होते.