लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
शेगाव, 29, ऑक्टोबर :- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील टेकडी परिसरातील घरात झोपलेल्या ७० वर्षीय वृद्धावर भटक्या कुत्र्यानी हल्ला केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. वृद्धावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शेगावातील टेकडी परिसरात नगर परिषदेच डम्पिंग ग्राउंड असल्याने या परिसरात शेकडो भटकी कुत्री दिवसभर असतात. सकाळी याच परिसरातील ७० वर्षीय वृद्ध आपल्या घरात झोपलेले असताना त्यांच्यावर अचानक ८ ते १० भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात या वृद्धाचा चेहऱ्यावर आणि ओठावर गंभीर जखम झाली. वृद्धाला तात्काळ शेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हे देखील वाचा :-