लोकस्पर्श न्यूज पोर्टल,
देसाईगंज, दि. २८ डिसेंबर : ग्रामपंचायत कूरुड ता. देसाईगंज जिल्हा. गडचिरोली यांच्या वतीने सन २०२१ची ग्रामसभा दिनांक २७/१२/२०२१ ला आयोजित केली होती. त्यामधे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदाची निवड होऊ घातली होती. त्या निवडी मध्ये कुरुड येथील संपूर्ण ग्रामवाशी जनता जनार्दन यांच्या सर्वानुमते महादेव बिसन ढोरे यांची एक मतांनी निवड करण्यात आली.निवडीनंतर गावच्या प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंच प्रशालाताई अविनाश गेडाम यांनी सत्कार समारंभ त्यांच्या राहत्या घरी पार पडला.
या कार्यक्रमामध्ये दिगंबरजी मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य, अविनाश भाऊ गेडाम उपजिल्हा प्रमुख शिवसेना गडचिरोली तथा ग्रामपंचायत सदस्य कुरुड, सुरेश मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य कुरुड, शंकर पारधी ग्रामपंचायत सदस्य कुरुड, विजुभाऊ कुंभलवार, यादव पारधी,बाबुरावजी फटिंग, अमरदीप मेश्राम, गिरीधर शिवणकर,देवरावजी नहाले धान्य व्यापारी,संजय हजारे,निशांत ठाकरे, आणि ग्रामवासियांची उपस्थिती होती.
यावेळी नवनियुक्त तंटामुक्त अध्यक्ष महादेव जी ढोरे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामवासीयांचे आभार मानले.
हे देखील वाचा :
राखीव वनांमध्ये असलेल्या नागरिकांचे अवैध अतिक्रमण वनविभागाने हटविले
“त्या” दोन अवैध अतिक्रमित धारकांचे वन्यजीव विभागाने काढले अतिक्रमण!
गौशाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, महिला गृहउद्योगाकरिता उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन पडले पार