कोरची येथील तहसील कार्यालयात प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
कोरची दि. 30 डिसेंबर: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक विभाग सज्ज झाला असून निवडणुकीचे काम सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या टप्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात कोरची येथील तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यानां प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने बुलेट यूनिट, कंट्रोल यूनिट आदींची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. निवडणुकीच्या कामावर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यानां मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेविषयक सविस्तर माहिती घेऊन प्रक्रिया व्यवस्थित व वेळेत पार पडावी यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी केले. या प्रशिक्षणाप्रसंगी कोरची येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.