लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 3ऑक्टोबर:
एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोहप्रकल्प येथे लोहखनिजाचे उत्तखनण करण्याचे काम त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी तर्फे सुरू करण्यात आले आहे.या ठिकानी आलापल्ली ट्रान्सपोर्टअसोसिएशनच्या वाहनांना वाहतूक करण्यासाठी काम देण्याची मागणी असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे.
2018 मध्ये सुरजागड येथे लाईट मिटर अँड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे काम सुरु केले होते आणि त्यांनी वाहतुकीसाठी आल्लापल्ली असोशियन चे सर्व वाहने कामावर लावली होती 16 जानेवारी 2019 रोजी एका अपघातामुळे काही अज्ञात लोकांनी वाहनांची जाळपोळ केली त्यात अल्लापल्ली चे पंधरा ट्रक होते अजून पर्य पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही नुकसान भरपाई मिळण्याकरिता असोसिएशनतर्फे कंपनीचे अधिकारी यांना वारंवार संपर्क साधला मात्र त्यांनी कुठलेही सहकार्य केले नाही याउलट कंपनीचे अधिकारी यांनी असोसिएशनला तोंडी आश्वासन दिले होते की परत कंपनीचे काम सुरू झाल्यास आम्ही आलापल्ली ट्रांसपोर्ट स्टेशनला प्राधान्याने काम देऊ त्यानंतर बर्याच अवधीनंतर दर पुन्हा कामाला सुरुवात झाली असून फेब्रुवारी 2019 मध्ये कंपनीने कामाची सुरुवात केली त्रिवेणी अर्थमूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरजागड प्रकल्प यांनी कामाची सुरुवात केल्यानंतर असोसिएशनच्या कार्यालयात येऊन तोंडी चर्चा केली असता आणि दगड वाहतुकीसाठी आलापल्ली ट्रान्सपोर्ट यांच्या सर्व वाहनांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघत होतो परंतु कंपनीचे वाहतुकीचे काम सुरू झालेले आहे आणि सदर काम बाहेरच्या व्यक्तींना वाहतूक करण्यासाठी देण्यात आले आहे त्यानंतर आम्ही प्रत्यक्षात कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्याचा प्रयत्न केले परंतु कंपनीच्या अधिकारी आमच्या सोबत चर्चा करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रान्सपोर्ट लोकांवर हा अन्याय आहे.
सुरजागड प्रकल्पात स्थानिक लोकांना काम देण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यानी मागणी केली होती.त्यानुसार कंपनीने स्थानिक वाहतूकदार संघटनेला काम देऊन सहकार्य करण्याची मागणी आलापल्ली ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे कऱण्यात येत आहे.