जिल्हाधिकाऱ्यांची थेट अधिकाऱ्यांच्या दालनात एन्ट्री

  • नवीन जिल्हाधिकारी येताच कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ
  • जिल्हाधिकारी आढावा घेत असताना नियोजन विभागातील कर्मचारी धडा-धड पोहचले कार्यालयात
  • पुष्पगुच्छसह उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच नवीन जिल्हाधिकाऱ्यांची एन्ट्री
  • जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या संपूर्ण विभागाचा घेतला आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. १५ फेब्रुवारी: वर्ध्याच्या जिल्हाधिकारी म्हणून प्रेरणा देशभ्रतार या आय.ए.एस अधिकारी नियुक्त झाल्यात. नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचताच कार्यालयाच्या विविध दालनात पोहचून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत कार्यालयीन कामकाज आणि शिस्तीचाच आढावा घेतलाय. यावेळी मात्र कार्यलयात उपस्थित नसणाऱ्या जिल्हा नियोजन कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अधिकारी स्वागतासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहचण्यापूर्वीच जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी विवीध दालनात पोहचून अनेकांना सरप्राईज दिले.

नवीन जिल्हाधिकारी आज कार्यालयात रुजू होणार असल्याने आधीच येथील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची साफसफाई आपल्या देखरेखीत उरकवून घेतली होती. नवा गडी नवा राज म्हणत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशभ्रतार यांच्या कठोर कार्यशैली आणि शिस्तप्रियतेचा धसका घेतला होता. कार्यालयाची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाना मिळत असलेल्या सूचना पाहून अधिकारीही अवाक झालेत.कार्यालयाच्या द्वारावरच ठेवण्यात आलेल्या झाडांच्या कुंड्या अपंगांचा रस्ताच अडवत असल्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्यांनी लक्षात आणून दिले. नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अगमनांनंतर आता नव्याने जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना देखील आपल्या कामकाजात चुणूक दाखवावी लागणार आहे.

Prerana DeshbhratarWardha Collector