तीन दिवसांनंतरही पाण्यातूनच सुरु आहे वाहनांचा धोकादायक प्रवास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २० जुलै : वसई विरार मध्ये रविवारी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे साचलेले पाणी अद्यापही काही परिसरात कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या सनसिटी गास रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखालीच आहे.

या रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.  हा मार्ग सोडून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी ८ ते १० किलोमीटर जास्त प्रवास करायला लागत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

निर्मळ, गास, वाघोली आदी गावांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर गुढगाभर पाणी साचल्याने हा मार्ग प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. तरीही काही वाहनधारक या मार्गानेच जाणे पसंत करत असल्याने पाण्यात अडकून वाहने बंद पडण्याचे प्रसंग घडत आहेत.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 

lead storyvasai virar