मोठी बातमी: आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग लगत नक्षल बॅनर व पत्रके आढळल्याने उडाली खळबळ

  • बॉम्ब शोधक पथकाने तपासणी करून बॅनर केले जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २४ मार्च: आलापली सिरोंचा महामार्ग ३५३ क वर असलेल्या सिरोंचा पुलानजीक आज सकाळच्या सुमारास नक्षल बॅनर व पत्रक झाडाला लावून आढळल्याने नागरिकांत मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे कालच गडचिरोली पोलिसांसमोर चार जहाल माओवाद्यानी आत्मसमर्पण केले होते.

आलापल्ली नजीक असलेल्या वर्दळीच्या या राष्ट्रीय महामार्गा वर आज सकाळच्या सुमारास मार्निग वाक करणाऱ्या नागरिकांना सिरोंचा पुलालगत असलेल्या सागवानाच्या दोन झाडाला लाल कापडी बॅनर प्लास्टिक च्या दोरीने बांधून असल्याचे दिसले. त्याखाली दोन काचेच्या शीशी मध्ये पांढऱ्या रंगाची भुकटी भरून वायर च्या साह्याने लटकून असल्याने तर्कवितर्कला उधाण आले होते.

या बॅनर मध्ये लिहिले सी-६० को चेतावणी झुठा सर्च अभियान चलाकर आदिवासी योके मकानो को जलना बंद करो. खुद्द की झूठी प्रशांसा करके जनता की आखो मे धुल झोकना बंद करो. वरना इसका अंजाम भूगताना होगा. भाकपा माओवादी अहेरी एरिया कमिटी असे लिहिले असल्याने त्यामुळे आलापल्ली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथून अवघ्या 4 किमी वर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय  आहे. घटने  च्या ठिकाणी पोलीस दाखल झाले त्यानंतर बिडीडीस पथकाला पाचारण करून आजूबाजूच्या परिसराची तपासनी करण्यात आली. यासोबत श्वाना द्वारे ही आजूबाजूला तपासणी करण्यात आली. बॉम्ब नसल्याची खात्री झाल्यावरच बी डीडी एस पथकाने हा लाल कापडी बॅनर काढून ताब्यात घेउन नष्ट केला आहे.

Gadchiroli Nakshal