धक्कादायक : घरमालकच निघाला चोरटा; चोराच्या उलट्या बोंबा!

मांडगाव येथील दरोडा प्रकरणाच पितळ पोलिसांनी केले उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गिरड, 9 जानेवारी : मांडगावात घर मालकाच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाब्या ताब्यात घेत 5 लाख 61 हजाराच्या रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिने लंपास करीत सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना शुक्रवार 8 जानेवारीला मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली होती. तक्रार करताच महादेव पिसेचे दरोडेखोर निघाला आहे. यामुळे सर्वत्र चर्चेला उधान आले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडगाव येथील महादेव पिसे (60) यांनी त्यांच्या घरी शुक्रवारी रात्री दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवत कपाटाची चाबी हिसकावून कपाटातील रोख 4 लाख 50 हजार रुपये व 1 लाख 11 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा 5 लाख 61 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील फिर्यादी महादेव पिसे यांना विचारपूस केली असताना त्यांनी गुन्ह्यातील चोरी गेलेले दागिने हे सोनाराकडे गहाण ठेवले. पैसे व दागिने चोरीस गेले नाही त्याचेवर कर्ज असल्याने चोरी झाल्याची खोटी तक्रार दिल्याचे कबूल केले. महादेव पिसे यांचे बयान घेऊन हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपुरे, मनीष कांबळे, अभिजित वाघमारे, गोपाल बावनकर, नवनाथ मुंडे यांनी केली

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकपोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे