शेतक-यांनो! केवळ १ रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा

अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. २१ : खरीप हंगाम २०२४ करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे. केवळ १ रुपये प्रती अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२० पासून तीन वर्षासाठी राज्यात ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार खरीप हंगाम २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगाम या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हावार विमा कंपन्यांची नावे व टोल फ्री क्रमांक : चंद्रपूर जिल्हयासाठी ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून १८००११८४८५ हा टोल फ्री क्रमांक आहेत. वर्धा व नागपूर जिल्हयासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून १८००१०३७७१२ हा टोल फ्री क्रमांक आहे. भंडारा जिल्हयासाठी चोलामंडलम एम एस जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून १८००२०८९२०० हा टोल फ्री क्रमांक आहे. गोंदिया जिल्हयासाठी युनिर्व्हसल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून १८००२००५१४२/ १८००२००४०३० हा टोल फ्री क्रमांक आहे. तर गडचिरोली जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून १८००१०२४०८८ हा टोल फ्री क्रमांक आहे.

पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश : हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान, पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड, ७/१२ उतारा, ८ अ, आधार संलग्न बॅक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बॅंक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे.

हे देखील वाचा,

दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे – आयुषी सिंह

आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात हयगय नको : आ. सुधाकर अडबाले

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि.ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि.चोलामंडलम एम एस जनरल इंन्शुरन्स कं.लि.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोलीयुनिर्व्हसल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं.लि.रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि.विभागीय कृषी सहसंचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावारसर्वसमावेशक पीक विमा योजना