शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

आम्हाला शक्तीपीठ महामार्गाचा फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

परभणी:  गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटीवर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन तासांपासून शेतकऱ्यांचे रास्ता रोको सुरू आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये जमीन मोजणीवेळी मोठी झटापट देखील झाली. यानंतर ग्रामस्थ या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलनाला बसले. यावेळी परभणी जिल्हातील अनेक मोठे नेतेही पोहोचले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी परभणीच्या शिंगणापूर पाटीवर सलग 3 तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

4 मार्च रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाबद्दल बोलताना खासदार संजय जाधव यांनी म्हटले की, शेतकरी वडीलोपार्जित जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायला तयार नाहीयेत.

या रास्तारोकोमध्ये खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या सहजपूर जवळा येथील सीमा बागल नावाच्या शेतकरी महिलेला वाढत्या तापमानामुळे भोवळ आली. यावेळी त्यांची दातखिळ ही बसल्याचं बघायला मिळालं.

shekpit
Comments (0)
Add Comment