कृषि माल प्रक्रियाव्दारेच शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे – स्नेहाताई हरडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०८ जयंतीनिमित्य आज दिनांक ०१.०७.२०२१ रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोजापूर-गडचिरोली येथे कृषि दिन साजरा करण्यात आला.

सदर कृषि दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे कार्यकारी परिषद सदस्या स्नेहाताई अरूण हरडे यांच्या हस्ते प्रतिभाताई चौधरी यांना जिजामाता कृषि भुषण पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला मार्फत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे कार्यकारी परिषद सदस्या स्नेहाताई अरूण हरडे म्हणाल्या की, कृषि क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून आजचा दिवस कृषि दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थतीचा सामना करून राज्यात कृषि क्रांती घडवून आणली. शेती आणि शेतकरी त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय असल्याने शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कृषि उत्पादनासोबत कृषि माल प्रक्रिया शेतकऱ्यांनी करावी व आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

कृषि विज्ञान केंद्र, सोजापूर-गडचिरोली चे कार्यक्रम समन्वयक संदिप एस. कन्हाळे यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच त्यांचे योगदानाबददल सविस्तर माहीती दिली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपला आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने सेंद्रीय शेती, गट शेती घ्या माध्यमातून उत्पादन घ्यावे तसेच महिला शेतकऱ्यांनी बचत गट तयार करून विविध मुल्यवर्थित पदार्थ तयार करावे व शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करून योग्य नफा मिळवावा. याकरीता कृषि विज्ञान केंद्राची मदत घ्यावी. कृषि विषयक समस्या असल्यास कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा. तसेच कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय, चामोर्शीचे अध्यक्ष अरुण हरडे यांनी सद्यस्थितीत शेतीला आधुनिकतेची जोड असणे आवश्यक आहे. वेळेवेर पिकाची पेरणी करणे, लागवड करणे, फवारणी करणे यासारखी कामे वेळेवर करने गरजेचे आहे. जेणेकरून उत्पादनात भर पडेल व याचा फायदा शेतकऱ्यांना होवू शकेल. याकरीता आधुनिक कृषि  औजारांचा शेतकऱ्यांनी वापर करणे गरजेचे आहे. त्यासोबतच शेतीस जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, मस्यपालन, शेळीपालन यासारखे जोडव्यवसायाची साथ असली तर शेतकरी कधीच कमी पडणार नाही असे प्रतिपादन केले.

प्रतिभाताई प्रभाकर चौधरी, जिजामाता पुरस्कार प्राप्त प्रगतिशिल शेतकरी यांनी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर-गडचिरोली यांचेकडून मार्गदर्शन घेऊन सेंद्रीय शेती सोबतच जोडव्यवसाय म्हणून उत्कृष्ट कुक्कुटपालन व शेळीपालन व्यवसायाला सुरवात केली तसेच आपल्या गावातील इतर शेतकरी महिलांना त्याचे धडे देत आहेत. त्याकरीता त्यांचे मी मनपुर्वक अभिनंदन करते. अशाप्रकारे जवजवीन प्रयोगशिल शेतकरी आपल्या गडचिरोली जिल्ह्यात तयार होवून आपले जिवनमान उंचावावे असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्नेहाताई अलग हरडे, कार्यकारी परिषद सदस्या, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला उपस्थित होते. तसेच सत्कारमुर्ती प्रतिभाताई प्रभाकर चौधरी, जिजामाता कृषिभुषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशिल शेतकरी नवेगाव, पो. मुडमा, ता.जि. गडचिरोली प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे अरूण हरडे, अध्यक्षा, केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय, चामोर्शी, संदिप एस. कन्हाळे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, तथा प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली, ज्ञानेश्वर व्ही. ताथोड, विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी), निलीमा पाटील, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), पुष्पक बोथीकर, विषय विशेषज्ञ (पिक संरवाण), डॉ. विक्रम एस. कदम, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्यशास्त्र), नरेश पी. बुध्देवार, विषय विशेषज्ञ (कृषिहवामानशास्त्र)  उपस्थित होते.

या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाचे नियोजन विस्तार शिवाज संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या मार्फत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले.

हे देखील वाचा :

महागाव येथे हत्तीरोग निर्मूलन अभियानाचा शुभारंभ

२०२१ टी २० विश्वचषकाचे ‘या’ तारखेपासून होणार सामन्यांना सुरुवात

 

lead storySnehatai Harde