जिल्ह्यातील ६५ हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान विकले; परंतु शासनाकडे शेतकऱ्यांचे ७६.८८ कोटीचे चुकारे थकले !

शेतकऱ्याच्या आर्अथिक डचणीत आणखी वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाचे ५३ तर मार्केटिंग फेडरेशनचे २४ केंद्रे आहेत. मात्र, प्रत्यक्षात आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ केंद्रांवर धानाची आवक सुरू आहे, तर मार्केटिंग फेडरेशनच्या २३ केंद्रांवर सध्या धानाची आवक सुरू आहे.

आदिवासी विकास महामंडळांतर्गत यावर्षी ४२ हजार १३२ शेतकऱ्यांनी तर मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत १७ हजारांवर शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर ४ हजार २२१ शेतकऱ्यांनी आतापर्यंत धानाची विक्री केलेली आहे.तर मार्केटिंग फेडरेशनच्याही केंद्रांवर आतापर्यंत आहे. अडीच हजारांवर शेतकऱ्यांनी धानाची  विक्री केली आहे.

सहा हजारापेक्षा जास्त  शेतकऱ्यांनी ६५  केंद्रांवर हमीभावने  धानाची विक्री केलेली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत  शासनाच्यावतीने हमीभाव धान खरेदी केंद्रांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे  ग्रामीण व  दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची सोय झाली, परंतु  हमीभाव धान खरेदी केंद्र लवकर सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना वेळीच धान विक्री करण्यासाठी वाट बघावी लागते. त्यामुळे  अनेक शेतकरी आपल्या आर्थिक पूर्ण करण्यासाठी  खुल्या बाजारातील  व्यापाऱ्यांना धानाची विक्री करून आर्थिक गरजा भागवतात.

जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत हमीभाव केंद्रांवर धानाची खरेदी सुरू आहे. परंतु महिनाभरापूर्वीपासून  धानाची विक्री करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळालेले नाहीत. आदिवासी विकास महामंडळाने १ हजार १८५ शेतकऱ्यांनाच ११ कोटी ३६ लाख ७४ हजार २८० रुपये अदा केलेले आहेत. मात्र, मार्केटिंग फेडरेशनने एकही पैसे अदा केलेले नाहीत. दोन्ही संस्थांकडे एकूण ७६ कोटी ८८ लाख ८५९ रुपये थकीत आहेत. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा व डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष धान खरेदीला सुरुवात झालेली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतची खरेदी आदिवासी विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात ४ हजार २२१ शेतकऱ्यांनी १ लाख ६४ हजार ७१०.९३ क्चिटल धानाची विक्री केलेली आहे. त्यापैकी १ हजार १८५ शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले आहेत. तर ३ हजार ३६ शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.

मार्केटिंग फेडरेशन मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत १७ हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत अडीच हजारांवर शेतकऱ्यांनी २ लाख १९ हजार क्विंटल धान विक्री केलेला आहे. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाहीत.

हे ही वाचा,

गृहखात्याकडून छाननी झाल्यानंतर मंत्र्यांना खासगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार

तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन

दूध विकून परत येताना दुचाकीस्वार युवकाचा अपघातात मृत्यू

मुंबईच्या समुद्रात पुन्हा अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक,

 

आदिवासी विकास महामंडळांतर्गत यावर्षी ४२ हजार १३२ शेतकऱ्यांनी तर मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत १७ हजारांवर शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे.आदिवासी विकास महामंडळाने १ हजार १८५ शेतकऱ्यांनाच ११ कोटी ३६ लाख ७४ हजार २८० रुपये अदा केलेले आहेत.जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाचे ५३ तर मार्केटिंग फेडरेशनचे २४ केंद्रे आहेततर मार्केटिंग फेडरेशनच्या २३ केंद्रांवर सध्या धानाची आवक सुरू आहेप्रत्यक्षात आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ केंद्रांवर धानाची आवक सुरू आहे