मुंबईतील फळ विक्रेत्यांवर उत्तरप्रदेश मध्ये जीवघेणा हल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05 नोव्हेंबर :- मूळचा उत्तरप्रदेश येथील प्रतापगढ जिल्ह्यातील आणि व्यवसाया निमित्त मुंबईत राहणाऱ्या मेवालाल चौहान यांचेवर आसपूर दोसरा थाना , बरसोली गावात त्याच्या राहत्या घरी रात्री झोपला असतांना दोघा जणांनी त्यांचेवर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने तो त्यातून बचावला.

याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करून १५ दिवस झाले तरीही अद्याप पर्यंत पोलिसांनी आरोपींना पकडलेले नाही. यामुळे मेवालाल चौहान याचे कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच आता साकडे घातले आहे. याबाबत मेवालाल यांचा मुलगा महेंद्रसिंग चौहान याने प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की आम्ही मुंबईत फळ विक्रीचा धंदा करतो. त्यातून काही पैसे मिळतात त्यातून गावाकडे जमीन वैगरे खरेदी करतो. हे येथील काही लोकांना बघवत नाही. म्हणून बबलू चौहान आणि अजय चौहान यांनी माझ्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. आम्ही या दोघांची नावे पोलिसांना देऊन १५ दिवस झाले तरी या आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेकडे दाद मागणार आहोत तरीही काही झाले नाहीतर आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालया बाहेर आमरण उपोषणास बसणार आहोत.

हे पण वाचा :-

Fatal attackon fruit sellers