मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हलोली गावाजवळ कारचा भीषण अपघात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

हालोली/ पालघर, 25 जून – अहमदाबाद महामार्गावरील हलोली गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील ५ प्रवाशांपैकी २ जण गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक गावकऱ्यांनी उपचारासाठी मनोर येथील रुग्णालयात दाखल केलं आहे.

मुंबईहून गुजरातकडे जाणारी कार चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पुलाच्या कठड्याला धडकून कारने २ पलट्या मारल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे पण वाचा :-