लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 20,ऑक्टोबर :- गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग 1 ची वैद्यकीय अधिकार्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे निवेदानाच्या माध्यमातून केली.
आमदार डॉ. होळी यांनी यावेळी जिल्ह्यातील मेडीकल काॅलेजचा प्रश्न, कंत्राटी सेवा देणार्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांचे रखडलेले मानधन, आरोग्य विभागात असणारी रिक्त पद याबाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्यांचे रिक्त पद लवकरच भरण्यात येतील असे आश्वासित केले.
हे देखील वाचा :-