गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 83 रब्बी पिक असलेल्या गावाची अंतिम पैसेवारी जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.15 मार्च: रब्बी पिकाची पैसेवारी संकलीत करुन सन 2020-21 या वर्षाची रब्बी पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हयाची अंतिम सरासरी पैसेवारी ही 0.69 आहे.

जिल्हयात एकूण 1688 गावे असून, रब्बी पिकाची गावे 148 आहेत,. त्यापैकी रब्बी गावामध्ये पीक नसलेली गावे 65 आहेत. रब्बी पीक असलेल्या 83 गावापैकी 50 पैशाचे आतील गावे 0 असून, 50 पैशाचे वर पैशेवारी असलेल्या एकुण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या उर्वरित सर्व 83 आहेत. अशा प्रकारे एकूण 83 रब्बी पिक असलेल्या गावाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेली आहे.

तालुका निहाय सुधारीत पैसेवारी:

गडचिरोली-0.53, आरमोरी-0.68, अहेरी-0.72 व सिरोंचा-0.63,  गडचिरोली जिल्हयाची एकुण सरासरी रब्बी हंगाम 2020-21 या वर्षाची सुधारीत पैसेवारी 0.69 आहे. सदर पैसेवारी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जाहीर केली आहे.

Gadchiroli Rabbi Gro