अखेर आ श्रीकांत देशपांडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अमरावती, दि. 21 नोव्हेंबर: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार व महा विकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचेवर अखेर राजापेठ पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा व आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
काल श्रीकांत देशपांडे यांनी कुठलीही परवानगी न घेता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या हॉलमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीत प्रचार सभा घेतली. यावर भाजप नेते माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची बहीण व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवार संगीता शिंदे यांनी जोरदार आक्षेप घेत आज विभागीय आयुक्त कार्यालयात तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केलं अखेर प्रशासनाने दखल घेऊन श्रीकांत देशपांडे यांचेवर कलम 188,269,270,135 व आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले…..
श्रीकांत देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Shrikant Deshpande