अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ! 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारली असून  भाजपने विधानसभेत तब्बल 132  जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आणि शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41  विजय मिळवला होता.

परंतु मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नव्हता परंतु दिनांक १५.१०.२०२४ रोजी नागपूर येथे फडणवीस सरकारचा  मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात  शपथ घेतली. एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली असून  यामध्ये 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्री तर  6 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

नव्या मंत्रिमंडळात  भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यासोबतच अजित पवार गटाच्या पाच नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यात सर्वाधिक चार कॅबिनेट मंत्रिपदे सातारा जिल्ह्याला  तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही तीन-तीन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्यासह तीन कॅबिनेट एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

हे ही वाचा,