FIPRESCI  संस्थेने सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी केली जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 22 ऑक्टोबर :- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स अर्थात FIPRESCI या संस्थेने सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ही यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

आपल्या देशात दरवर्षी वीसपेक्षा जास्त भाषातील चित्रपटांची निर्मिती होत असते. विविध विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना बघायला आवडतात. भारतीय भाषांमधील सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांची निवड करणे अतिशय अवघड गोष्ट आहे. हे काम आता FIPRESCI या संस्थेने केले आहे. या यादीमध्ये एकही मराठी चित्रपटाचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

FIPRESCI या संस्थेने सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची निवड करण्यासाठी तीस सदस्यांनी गुप्तपणे मतदान केले. त्यानंतर सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये चार बंगाली, चार हिंदी, एक मल्याळम आणि एक कन्नड चित्रपटाचा समावेश आहे.

दहा सर्वकालिन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी –

‘पथेर पांचाली’ – हा चित्रपट 1955 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सत्यजित रे यांनी केले आहे. अनेक चित्रपट समीक्षक या चित्रपटाचे आजही कौतुक करतात.

‘मेघा धाका तारा’ – ऋत्विक घटक दिग्दर्शित मेघा धाका तारा हा चित्रपट 1960 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अभिनेत्री सुप्रिया देवी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

‘भुवन शोम’ – मृणाल सेन दिग्दर्शित भुवन शोम हा हिंदी चित्रपट 1969 मध्ये दिग्दर्शित झाला.

‘एलिप्पाथायम’ – या चित्रपटाचे दिग्दर्शन अदूर गोपालकृष्ण यांनी केले. हा मल्याळम भाषेतील चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला.

‘घटश्राध्द’ – गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केलेला घटश्राध्द हा कन्नड चित्रपट 1977 मध्ये प्रदर्शित झाला.

‘गरम हवा’ – 1973 मध्ये रिलील झालेल्य गरम हवा या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन एम.एस. सत्थू यांनी केले. या चित्रपटात बलराज सहानी, फारूख शेख, गीता सिध्दार्थ या कलाकारांनी प्रमुख भुमिका साकारल्या.

‘चारूलता’ – सत्यजित राय दिग्दर्शित हा बंगाली चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात सौमित्र चटर्जी, माधबी मुखर्जी यांनी प्रमुख भुमिका साकारलीत्र

‘अंकूर’ – श्याम बेनेगल दिग्दर्शित अंकूर हा हिंदी चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झाला. अनंत नाग, शबाना आझमी यांनी या चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली आहे.

‘प्यासा’ – गुरूदत्त दिग्दर्शित प्यासा हा चित्रपट 1956 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती पटकथा लेखन हे देखील गुरूदत्त यांनीच केले असून या चित्रपटात त्यांनी प्रमुख भुमिका देखील साकारली आहे.

‘शोले’ – 1975 साली प्रदर्शित झालेला शोले हा चित्रपट आज ही सिनेप्रेमी आवडीने बघतात. बाॅलिवूड मधील आयकाॅनिक चित्रपटांपैकी एक असणारा शोले हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी अशी तगडी स्टारकास्ट असणार्या या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

हे पण वाचा :-

announcedFIPRESCIIndian filmsten best