पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश – रामनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

सराईत गुन्हेगार गजाआड; ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : शहरात घरफोडी, जबरी चोरी आणि दुचाकी चोरीने नागरिक त्रस्त असताना रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, चोरट्यांकडून ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई..

चंद्रपूर शहरात मालमत्तेविरुद्ध वाढणाऱ्या गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक ममुक्का सदुर्शन यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अवसफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले यांच्यासह अन्य कर्मचारी या पथकात सहभागी होते..

गोपनीय माहितीवरून पोलिसांची धावपळ…

घरफोडीच्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, चंद्रपूर शहर आणि बल्लारशहा परिसरात जबरी चोरी आणि वाहनचोरी करणारे दोन संशयित गुन्हेगार वरोरा नाका परिसरात लपून बसले आहेत. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी वरोरा नाक्याजवळील पुलाखाली छापा टाकत दोघांना अटक केली.

अटक आरोपींची ओळख..

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :

1. अदिष उर्फ अक्रम शेख (वय २१, रा. फुकटनगर, चंद्रपूर)

2. अदमत्त रतन गाईन (वय १९, रा. रामनगर, भगतसिंग चौक, चंद्रपूर)

हे दोघेही आधीपासून गुन्हेगारीच्या रेकॉर्डवर असून त्यांच्यावर आधीचेही गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी आरोपींच्या कब्जातून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे :

एका घरफोडीत चोरीस गेलेला ऐवज MH 34 BU 2533 क्रमांकाची चोरलेली दुचाकी, तीन मोबाईल फोन्स एकूण किमतीचा मुद्देमाल – ७२,२०० रुपये

पाच गुन्ह्यांची उकल.पोलिसांनी उघड केलेले गुन्हे पुढीलप्रमाणे :

1. रामनगर पो.स्टे. गु.क्र. 368/2025 – कलम 331(3), 331(4), 305

2. रामनगर पो.स्टे. गु.क्र. 365/2025 – कलम 303(2)

3. बल्लारशहा पो.स्टे. गु.क्र. 321/2025 – कलम 309(4)

4. चंद्रपूर शहर पो.स्टे. गु.क्र. 330/2025 – कलम 303(2)

5. चंद्रपूर शहर पो.स्टे. गु.क्र. 331/2025 – कलम 303(2)

पथकातील पोलीसांचे कौतुक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक ममुक्का सदुर्शन, अपर पोलीस अधीक्षक (वरना) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी : अवसफराजा शेख, देवाजी नरोटे, हनुमान उगले, विजयेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लाल यादव, पेतराज वसडाम, प्रशांत शेंदरे, सवचन गरुडे, मनीषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, वहा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पिपळकार इत्यादी.

शहरात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास

या धडक कारवाईमुळे चंद्रपूरकरांमध्ये पोलिसांबाबत अधिक विश्वास निर्माण झाला आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असून, पोलिसांची अशीच ठोस पावले गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.