कूडूस ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे बाजारपेठेत पूरजन्य परिस्थिती.

वाडा तालुक्यातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या कूडूस ग्रामपंचायतीने वेळेवर नाले सफाई न केल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाडा प्रतिनिधी – किरण दुपारे 8 जुलै :- पाऊस सुरू होण्याअगोदर स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कडूस ग्रामपंचायतला सफाई करण्याकरिता वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.परिणामी नाले तुंबल्याने कुडूस नाक्यावर अमृतेश्वर शॉपिंग सेंटरच्या समोर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायतिला जाब विचारला असता सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभाची असून हात झटकले. तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते की हा ग्रामपंचायतचा विषय आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मध्ये सामान्य नागरिक मात्र भरडला जातो. येथील नागरिक आणि व्यापारी तसेच रिक्षचालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या प्रश्नाबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.