गडचिरोली जिल्ह्यासाठी ६९०० शेतकऱ्यांना प्रत्येकी रु. ६०० प्रती एकर प्रमाणे धानाचे सवलतीच्या दराने बियाणे उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासुन ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असुन शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबीकरीता अर्ज करावयाचा आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना ” या शीर्षकाअंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील भात, तुर, इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार. जिल्हयाकरीता प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतील धान (वाण) 1247 किंव्टल व 10 वर्षावरील धान (वाण) 623 किंटल आणि 10 वर्षाआतिल तूर (वाण) २१ क्वी. 10 वर्षा वरील १३ क्वी चे भौतिक लक्षांकअसुन धान पिकाकरीता ६२२० व तूर पिकाकरीता ६८० शेतकर्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

तरी धान बियाणे साठी प्रती शेतकरी ६०० रु. व तूर पिकाकरीता २५० प्रती शेतकरी अनुदान मिळणारअसून अर्ज करण्याकरीता असुन 24 मे, 2021 पर्यंत अंतीम मुददत देण्यात आली असून इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी MAHADBT पोर्टल वर (https://mahadbtmahait.gov.in/Farmer/home/index)  या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे.

हे देखील वाचा : 

पोलीस नक्षल चकमक : १३ मृत नक्षल्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस!

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार मार्गदर्शन…

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

gadchiroli farmerlead story