वाघाचा रस्ता अडविल्या प्रकरणी ‘त्या’ ४ जनांना वन विभागाने दिले नोटिस

दोन दिवसात मागितले उत्तर कारवाईचे संकेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मोहर्ली-पद्मापूर रोडवरील दोन वाघाचा मार्ग अडविण्याच्या संदर्भात वायरल झालेल्या व्हिडीओमुळे वन विभागात एकच खड़बड़ उडाली आहे.

मोहर्ली येथे राहणाऱ्या ४ जणांना मंगळवारी नोटीस देण्यात आली असून दोन दिवसांत उत्तर मागविण्यात आले आहे,  त्या चौगापैकी एक रिसोर्ट मालकाचा मुलगा आहे. दूसरा हा पर्यावरणीय कार्यकर्त्याचा मुलगा आहे. मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी राघवेंद्र मून यांनी अरविंद बांडा, संकेत वीखंडे, साहिल बेग आणि शालिक जोगवे यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

दुचाकीचा नंबर न घेता दुचाकीवरून फोटो काढणार्‍या व्यक्तीची ओळख अरविंद बांडा अशी आहे.  तर एक दुचाकी  शालिक जोगवे यांच्या नावावर नोंदली गेली आहे. दुसर्‍या गाडीतील व्यक्तीचे नाव संकेत वीखंडे असे आहे. तीसर्‍याची ओळख साहिल बेगच्या रूपात झाली असल्याचे माहिती मिळाली आहे. हा वाघाचा मार्ग क्षेत्र आहे. या मार्गावर नियमित वाघ फिरत असतात.

यावेळी वाघाला ज्या प्रकारे त्रास देण्यात आला आहे ते चुकीचे आहे. तर दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे ही बफर वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा : 

मोठी बातमी : बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव, दोन दिवसात होणार निर्णय – शिक्षणमंत्र्यांची घोषणा

‘त्या’… महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण

 

lead storytadoba ti