लोकस्पर्श न्युज नेटवर्क
एटापल्ली 13 फेब्रुवारी :- एटापल्ली तालुक्यातील मौजा – पंदेवाही येथिल सुनील लक्ष्मण चन्नेकर वय – 28 वर्ष मागील 3 वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असून एम्स रुग्णालय, नागपूर ला उपचार सुरु आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून उपचार घेण्यास अडचण होत आहे. ही बाब भारत राष्ट्र समितीचे नेते, माजी आमदार तथा आवीस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम आज एटापल्ली तालुक्यातील दौऱ्यावर असतांना आविस च्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यावर दिपकदादा आत्राम यांनी चन्नेकर कुटुंबाची भेट घेऊन आजाराची माहिती घेऊन विचारपूस केली व आर्थिक मदत केले.
या वेळी मुलाची आई कमलाबाई लक्ष्मण चन्नेकर, संजय चरडुके माजी जी. प. सदस्य, श्रीकांत चिप्पावार तालुका उपाध्यक्ष आविस एटापल्ली, बाळु आत्राम उपसरपंच ग्रा. प. गुरुपल्ली, बाजीराव आत्राम, अशोक चोपदंडीवार, आशन्ना चोपदंडीवार, संतोष इसनकर, विनोद कावेरी सह आविस पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा :-