लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे 27 ऑक्टोबर :- पुण्यातील माजी आमदार विनायक महादेव निम्हण यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज रात्री नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्याच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीनगर मतदारसंघातून ते तीन वेळा विधानसभेत निवडून गेले होते. विनायक निम्हण यांनी सोमेश्वर फाउंडेशनची स्थापना करून पाषाण परिसरात मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे.
शिवसेना शाखाप्रमुख पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.१९९५ मध्ये ते शिवसेनेचे विभागप्रमुख झाले त१९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निम्हण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यामध्ये विनायक निम्हण यांचा देखील समावेश होता. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
हे पण वाचा :-