माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयींची जयंती; सुशासन दिन साजरा करत अभिवादन

भाजपा सावली तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात ‘गुड गवर्नेंस डे’ अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. २०१४ सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी २५  डिसेंबर रोजी ‘गुड गवर्नेंस डे’ साजरा करण्याची घोषणा केली होती. आज देखील यानिमित्तानं अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींना अभिवादन केलं आहे.

सावली दि,२६ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी सावली तर्फे भाजपा जनसंपर्क कार्यालय सावली येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.

कार्यक्रमाच्या सुरुवतीला अटलबिहारी  वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार करून नमन केले,तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले, स्व.अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे नव्हेतर संपुर्ण जागांचे नेते होते,देशात कोणताही पक्ष असो त्यांना आदर्श मानत होते,अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व कणखर आणि प्रेनादायी होते अश्या नेताचा आज वाढदिवस त्यांच्या या जयंतीनिमित्त भाजपा सावली वतीने त्यांना कोटी कोटी नमन करण्यात आले.


यावेळी उपस्थित अविनाश पाल जिल्हाध्यक्ष ओबीसी तथा तालुकाध्यक्ष सावली,सतिश बोम्मावार तालुका महामंत्री,प्रकाश पाटील गड्डमवार,अर्जुन भोयर,दिवाकर गेडाम,प्रकाश खजाजी,दौलत भोपये,बोंडुजी बोरकुटे,राहुल लोडल्लीवार,अभय संतोषवार,अवि चरलावार,राकेश गोलपल्लीवार,प्रकाश जक्कुलवार,तुळसीदास भुरसे
व तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

हे देखील वाचा ,

सुपरस्टार अभिनेता सलमान खान ला सर्पदंश.

‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन

कोरोनाच्या मृत यादीतील एक व्यक्ती जिवंत, प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर!

Lead news pm narendra modimla sudhir mungntiwar