लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : शेत शिवारात जंगली चितळाची शिकार करून मासाची विलेह्वा विल्हेवाट तसेच वाटणी करताना प्रकरणात सहभागी असलेले तिघांपैकी एकाने बिंग फोडल्याने वन विभागाला माहिती मिळाल्याने चार आरोपींना अटक केली आहे.
शेतालगत फासे लावून चितळाची शिकार केली. त्यानंतर मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी अन्य तिघांना बोलावून वाटणी केली व मांस आपापल्या घरी शिजविले; पण यापैकीच एकाने शिकारीचे बिंग फोडले. चितळाची शिकार झाल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी चारही आरोपींना अटक केली. ही कारवाई सोमवार, ९ डिसेंबर रोजी दुपारी अहेरी वनपरिक्षेत्रात करण्यात आली.
शंकर रामा आत्राम, किशोर मल्लेश सडमेक, मल्लेश येर्रा सडमेक, मुकेश कलमशाही मडावी रा. विजयपूर ता. मुलचेरा, अशी आरोपींची नावे आहेत. अहेरी तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोटलाचेरू गावाच्या जंगलात रविवार, ८ डिसेंबर रोजी सकाळी एका चितळाची शिकार करण्यात आली. शिकारीनंतर अन्य तिघांना बोलावून मांसाची वाटणी केली. याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी चारही आरोपींकडून शिजवलेले शिल्लक मांस जप्त केले. अहेरी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाची अधिक तपास एसीएफ विलास चेन्नुरी करीत आहेत.
हे ही वाचा,