लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 24 एप्रिल : गडचिरोली जिल्हातील वडसा तालुक्यात दुर्दैवी घटना घडली असून लग्नं समारंभ कार्यक्रम आटपवून घराकडे परतीचा प्रवास करीत असताना अचानक अवकाळी पाऊस, वादळ वारा, विजेचा कडकडाट सुरू झाल्याने राष्ट्रीय मार्गावर असलेल्या झाडाचा आसरा घेतला मात्र त्याच कुटुंबावर वीज पडून दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासरवाडीतील लग्नसमारंभ आटोपून चौघे परतत होते, यावेळी अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. सोबत दोन चिमुकल्या असल्याने दुचाकी उभी करुन चौघे झाडाखाली थांबले.
यावेळी अचानक झाडावर वीज कोसळली आणि यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. हृदय हेलावणारी ही घटना तालुक्यातील कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील तुळशीफाटा येथे आज(दि 24) सायंकाळी पावणे सहा वाजता घडली. बाली भारत राजगडे(२), देवाशी भारत राजगडे (४), अंकिता भारत राजगडे (२९) व भारत राजगडे (३५, सर्व रा. आमगाव बुट्टी ता.देसाईगंज) या चौघांचा घटनेत मृत्यू झाल्याने जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे पण वाचा :-