कोंढाळl जंगल परिसरात चार वाघाचा वावर, फरी रस्त्यावरच मांडले ठाण;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : मागील दोन ते तीन वर्षापासून जिल्ह्यातील वडसा वनविभागात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, चितळ, सांबर यासारखे वन्यप्राणी जास्त प्रमाणात वावरताना दिसून येत आहे. जंगली वन्य प्राण्यांनी बऱ्याच नागरिकांचा जीव सुद्धा घेतलेला आहे.

काही दिवसांपूर्वी तीन नर वाघांसह एक मादी वाघ ट्रॅप कॅमेराबद्ध झालेला होता. वडसा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या  देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात वाघाचा वावर असून यापैकीच एक वाघ शुक्रवार, ३ जानेवारी रोजी दुपारी फरी गावाच्या कक्ष क्रमांक ८५३ मध्ये तलावालगतच्या रस्त्यावर दिसून आला.  त्यानंतर वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

फरी गावाच्या कक्ष क्रमांक ८५३ मधील तलावालगतच्या रस्त्यावर वाघ दिसल्यामुळे  नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवराजपूर ते फरीदरम्यान कक्ष क्रमांक ८५३ मध्ये कुरुड फाटा ते किन्हाळा मुख्य मार्गाला फरी गावाला लागून असलेल्या ह्या कक्षात हा वाघ रस्त्याच्या कडेला बसून असल्याचे नागरिकांनी शुक्रवारी पाहिले.  आधीच कोंढाळा जंगल परिसरात तीन वाघ व एक मादी वाघ वनविभागाने लावलेल्या टॅप कॅमेरात कैद झाले होते.  तसेच उसेगाव जंगल परिसरात अनेकदा  वाघ आढळून आलेला आहे. त्यामुळे  शुक्रवारी शिवराजपूर ते फरी रस्त्यावर  वाघ दिसून आल्याने  नागरिकात भीती निर्माण झाली आहे.  सदर वाघाच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष आहे. फरी, शिवराजपूर, कोकडी या गावांमध्ये दवंडी दिलेली असून  नागरिकांना  शेतशिवारात, जंगलात एकटे न जाण्याच्या सूचना  वनविभागाकडून करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा, 

राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण संख्येत वाढ, ऐन थंडीत हातपायांना ठणक,

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न

 

गडचिरोली पोलीसांनी 21,00,400/- रुपयांचा अवैध दारु व मुद्देमाल जप्त.

 

३ जानेवारी रोजी दुपारी फरी गावाच्या कक्ष क्रमांक ८५३ मध्ये तलावालगतच्या रस्त्यावर दिसून आलावडसा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या  देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात वाघाचा वावर