सर्च हॉस्पिटलमध्ये मोफत आर्थ्रोस्कोपी सर्जरी कॅम्प यशस्वी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात २ मे २०२५ रोजी विशेष आर्थ्रोस्कोपी ओपीडी व शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये मुंबई येथील प्रख्यात आर्थ्रोस्कोपी सर्जन डॉ. मिथेन शेठ यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली गुडघा आणि खांद्याच्या सांध्यासंबंधी समस्या असलेल्या रुग्णांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. यओपीडी मध्ये तपासणीतून निवड करण्यात आलेल्या तिन रुग्णांवर आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

आर्थ्रोस्कोपी ही एक आधुनिक आणि कमी आघात करणारी शस्त्रक्रिया पद्धत आहे. यामध्ये एक लहान कॅमेरा सांध्याच्या आत टाकून त्याचा आंतरिक भाग पाहता येतो, तसेच आवश्यक असल्यास त्याच प्रक्रियेद्वारे उपचारही करता येतो. मोठ्या चिरफाडीची गरज नसल्यामुळे रुग्णांना कमी वेदना होतात, रक्तस्राव कमी होतो, आणि दवाखान्यात राहण्याचा कालावधीही कमी असतो. त्यामुळे रुग्ण लवकर दैनंदिन कामकाजात परतू शकतो.

या ओपीडीमध्ये खांदा वा गुडघ्याच्या सांध्यात सतत किंवा हालचालीवेळी होणाऱ्या वेदना, जुने अपघात किंवा खेळामुळे झालेल्या दुखापती, लिगामेंट किंवा कार्टिलेज तुटणे, मिनिस्कस इजा, खांदा डिसलोकेट होणे, फ्रोझन शोल्डर, आणि सांध्यातील सूज व तिरकसपणा अशा समस्या असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या रुग्णांची निवड करून त्यांच्यावर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सर्जरी करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णांबरोबर आलेल्या त्यांच्या एक नातेवाईकासाठी मोफत मेसची सोय करण्यात आली