कोरोना प्रतिरोधक व्हॅक्सिन (लस) घेण्यासाठी मोफत ऑटो सेवा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. १४ जून : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती व आरोग्य विभाग, गडचिरोली यांचे परवानगीने आणि एकांश ट्रस्ट, पुणे तथा अभिनव बहुद्देशीय कला मंच, गडचिरोली यांचे वतीने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे गडचिरोली शहरातील गंभीर आजाराने ग्रस्त, अपंग, अंध, अतीशय वृध्द जेष्ठ नागरिक, स्तनदा माता यांना कोरोना प्रतिरोधक व्हॅक्सिन(लस) घेण्यासाठी मोफत ऑटो सेवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

आठवड्यातून दोन दिवस- सोमवार, बुधवारी ला लसीकरण केंन्द्रावर जाणे-येणे करीता हा ऑटो मोफत राहणार आहे.

सेवा कार्यक्रमाचे उद्घाटन योगिताताई पिपरे, नगराध्यक्ष- नगर परिषद, गडचिरोली प्रमुख पाहुणे डाॅ.सुनिल मडावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली डाॅ. पेंदाम, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली डाॅ. बनसोडे, जिल्हा साथरोग अधिकारी, गडचिरोली, शरद मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक, गडचिरोली बि.एल.ताकसांडे, अधिक्षक- नगर परिषद, गडचिरोली सतिश पवार, अध्यक्ष- लाॅयन्स क्लब, गडचिरोली पांडूरंग घोटेकर, अध्यक्ष- जेष्ठ नागरिक संघटना, गडचिरोली डि.एन.बर्लावार, माजी अध्यक्ष- जेष्ठ नागरिक संघटना, गडचिरोली एस. के. बावणे, सचिव- जेष्ठ नागरिक संघटना, गडचिरोली मुकुंदराव उंदिरवाडे, अध्यक्ष- अपंग संघटना, गडचिरोली कुंदा गेडाम, गटप्रर्वतक- आशा वर्कर, गडचिरोली पुनम डोंगरे, अंगणवाडी सेविका,मा.रोशन नैताम,व्यवस्थापक,सखी लोकसंचालीत साधन केंद्र, गडचिरोली गिता हिंगे, दिलशाद पिरानी, आधार फाऊंडेशन, गडचिरोली अकिल शेख सचिव-अभिनव बहुद्देशीय कला मंच गडचिरोली, प्रकाश मोहीतकर, सहसचिव, शंकरराव मोगरे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक गडचिरोली जिब्राईल शेख, मयुर गेडाम, आॅटो चालक- मो.सोहेल मो. ताज, डिंपल खंडागळे उपस्थित होते.

हे देखील वाचा :

कोविड -१९ लसीकरण मोहीम संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  घेतली जनजागृती सभा

ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण होईल – मंत्री उदय सामंत

तेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी

free Autorikshawlead story