दोन वाघांचा गडचिरोली-गोगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास मुक्तसंचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १७ जानेवारी:- वडसा वनविभागात येत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रात असलेल्या गडचिरोली-गोगाव मार्गावर दोन वाघ (नर,मादी)  रात्रीच्या सुमारास जंगलातून रोड वरुन  मार्गक्रमण करतांना अचानक दुचाकी स्वाराच्या समोर आले. त्यावेळी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने प्रसंग ओळखून दुचाकी स्वाराला गाडीच्या आत घेतले. यावेळी त्यांनी वाघाचा रस्त्यावर फिरतानांचा व्हिडियो रेकॉर्ड केला.

2 वाघ तब्बल 5 मिनिट रस्त्यालगत फिरत होते. दुचाकीस्वाराने रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या दुचाकी जवळ जाऊन हे वाघ परत फिरले. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील वनात वाघांचा प्रचंड धुमाकुळ माजला आहे. जंगल परिसरात मागील महिन्यात राजगाटाचक येथील नागरिकाला वाघाने ठार केले होते. गोगाव येथील महिलेस ठार केले तसेच दिभना येथील नागरिकाला जखमी केले. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे बळी पडले आहेत. शेळ्या, मेंड्या, कोंबळ्या, बकऱ्या यांच्यावर हल्ला करत आहे.

तर काल शेतावरुन येणाऱ्या महिलेवर हल्ला केला. सुदैवाने प्राण वाचले असले तरी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरनी कळविले आहे. वनात जळावू सरपणासाठी लोकांनी जाने बंद केले असले तरी वाघच शहराकडे येत असल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या सोबतच शहरातही भीतीचे वातावरण आहे. वन विभागातर्फे वाघापासून सतर्क राहण्यासाठी गावात दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे.

वडसा वन विभागातील जंगलात वाघाचे वास्तव्य असून गावात दवंडी पिटवून नागरिकांना याची माहिती दिली जात आहे. सरपण गोळा करणे व इतर कामासाठी नागरिकांनी जंगलात जाऊ नये.

मनोज चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक, वडसा वन विभाग

Gadchiroli Gogav TigerGadchiroli TigerPorla Range