लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : “शिवणकाम शिकलं… आता मी घरात बसून माझा व्यवसाय सुरू केला. आणि माझ्या मुलाचं शिक्षणही आता मी स्वतःच्या कमाईतून करू शकते…” — असं म्हणणाऱ्या जैनाबाईच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, म्हणजेच ‘आरसेटी’ गडचिरोलीतर्फे सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा खरा परिणाम!
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), गडचिरोलीतर्फे आता पुन्हा महिलांसाठी दोन खास मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत –
✂️ लेडीज टेलरिंग (वस्त्रचित्रकला) – ३१ दिवस
💄 ब्युटी पार्लर प्रशिक्षण – ३५ दिवस
🧵 प्रशिक्षण काय शिकवेल?..
- कपडे शिवण्याचे संपूर्ण कौशल्य – ब्लाऊज, ड्रेस, सलवार, पॅटर्न कटिंग..
- ब्युटी पार्लर कौशल्ये – मेकअप, फेशियल, स्किन केअर, हेअर कटिंग..
- व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन..
- केंद्र सरकार मान्य प्रमाणपत्र..
- बाजार अभ्यास दौरा – खरेदीदार कसे मिळवायचे, नफा कसा वाढवायचा…
🛏️ काय मिळणार?
१००% मोफत निवासी प्रशिक्षण
राहण्याची, नाश्त्याची, जेवणाची पूर्ण मोफत सोय
अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शन..
एक पूर्ण स्वप्न उभारण्याची संधी!
📍 कार्यालयाचा पत्ता..
बँक ऑफ इंडिया आरसेटी, गडचिरोली
(जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, बांधकाम भवनासमोर, मुळ रोड)
👥 कोण अर्ज करू शकतो?
वय: १८ ते ४५ वर्षे
कागदपत्रे:
✅ आधार कार्ड
✅ बँक पासबुक
✅ टीसी / मार्कशीट
✅ ४ पासपोर्ट फोटो
✅ रेशन कार्ड / जॉब कार्ड / बचत गट ओळख
📲 अर्ज कसा कराल?
दिलेला QR कोड स्कॅन करा
ऑनलाईन फॉर्म भरा
तुमचं पुढचं पाऊल स्वावलंबनाच्या दिशेने ठेवा!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
९४०४१८८२३९ / ८६९८७५८५०९
(सकाळी १० ते सायं. ५ दरम्यान)
🌟 “घरातलं काम तुम्ही करता… आता स्वतःचा व्यवसायही करू शकता!”
गडचिरोलीच्या महिलांसाठी ही केवळ प्रशिक्षणाची नव्हे, तर जग बदलण्याची संधी आहे. नोकरी मिळवण्याची किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक बहिणीसाठी ‘आरसेटी’तर्फे उभारलेला हा स्वावलंबनाचा आधारस्तंभ आहे. आजच निर्णय घ्या… उद्याचं भविष्य तुमच्याच हातात आहे!