यवतमाळ पोलिसांकडून झालेल्या या अभिनव उपक्रमाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली असून, त्यांनी आपल्या एक्स ( ट्विटर) अकाऊंटवरून यवतमाळ पोलिसांचे व आयोजकांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांनी मुलींना दिलेल्या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत असे उपक्रम राज्यभर राबविण्याची गरज असल्याचे व्यक्त केली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिर पोलिस मुख्यालयात २० ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत २२८ मुलींसाठी दोन दिवसीय मोफत निवासी महिला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या महिला सुरक्षा कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण, सायबर गुन्हे यांची माहिती देण्यात आली, कायदेविषयक माहिती व आरोग्य विषयक माहीत देण्यात आले.
या प्रशिक्षणात महिलाना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, विविध संकटांमध्ये प्रसंगावधान कसे राखावे, याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या शारीरिक व मानसिक सबलीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाला पालक, शिक्षक तसेच नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
https://x.com/dev_fadnavis/status/1916068072764674260?s=48&t=3QaQ8qT3g3shsl4scPoTjQ
यवतमाळ पोलिस विभागांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली असून, त्यांनी आपल्या एक्स ( ट्विटर) अकाऊंटवरून पोलिसांचे व आयोजकांचे विशेष कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुलींना दिलेल्या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत असे उपक्रम राज्यभर राबविण्याची गरज असल्याचे भावना व्यक्त करीत स्वतः व्हिडिओ एक्स वर शेअर केला असल्याने सर्वत्र पोलिस विभागच कौतुक होत आहे.
यवतमाळ पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली असून, भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे घेण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.