लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 6 एप्रिल :- अहेरी इस्टेटचे राजे व त्याकाळी दानशूर राजा म्हणून परिचित असलेले कै. श्रीमंत राजे धर्मराव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राजे अमब्रिराव महाराज यांच्या मार्गदर्शनात राजनगरीतील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून स्थानिक राजघाटावर व दानशूर चौकातील अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. राजघाटावर राणी रुक्मिणी देवी, कुमार अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, चित्तेश्वरराव बाबा, विकी बाबांसह राज परिवारातील मंडळींनी कै. धर्मरावांना श्रद्धांजली वाहिली.
अभिवादन कर्त्यामध्ये प्रकाश गुडेलीवार, प्राचार्य मनोरंजन मंडल, प्राचार्य संजय कोडेलवार , संतोष उरेते , प्राचार्य अनिल भोंगळे, प्रा.रूखमोडे, मुख्याध्यापक , शफिक शेख, धोटे तसेच सेनि मुख्याध्यापक धीरज महंत, प्राचार्य सत्यनारायण गुप्ता, कृष्णा मंचालवार,प्रा तानाजी मोरे, प्रा रमेश हलामी, नगरसेवक उईके, जयश्री खोंडे, माजी जिप सभापती सुवर्णा खरवडे, संतोष मध्दीवर,सचिन पेदापल्लीवार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष रूषी सुखदेवे, प्रा अतुल खोब्रागडे तसेच अल्लापल्ली, नागेपल्ली, महागाव , व्यंकटराव पेटा व अहेरी येथील धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश अभिवादन करताना होता. यावेळी रवी नेलकुद्री, रमेश समुद्रलवार, अमोल गुडेलिवार, आलापल्लीचे उपसरपंच तथा तालुका भाजपा प्रभारी विनोद अकणपल्लीवर यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते.
हे पण वाचा :-