लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी मुंबई, 26, ऑक्टोबर :- ऐन दिवाळीत केंद्र सरकारच्या अन्न-धान्य गोदमाला आग लागल्याने सर्वत्र हाहाकार झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नवी मुंबईतील कळंबोली येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाला आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत एफसीआयचा जी पाच बी या गोदामातील लाखो रुपयांचे अन्नधान्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती मिळाली आहे. आग विझविण्यात पनवेल, कंळबोली अग्निशमन दलाला यश आले आहे.
अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली. हे गोदाम केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्न धान्याचा साठा ठेवला जातो.
रायगड, मुंबई, नवी मुंबईसह इतर ठिकाणी याच गोदामातून रेशन दुकानदारांना माल पाठवला जातो. सध्या या गोदामात किती मेट्रीक टन माल होता. ही माहिती केंद्राचे संबंधित विभागाचे डीजी अधिकारी देऊ शकतील. ते अद्याप घटनास्थळी दाखल झाले नसल्याने नुकसानीची आकडेवारी अद्याप कळू शकली नाही. मात्र आगीचे लोंढे पाहता लाखो रुपयांचे धान्य या गोदामात जळून खाक झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा :-